पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील गावाक्या आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या परिसरातील रस्त्यामध्ये दिवसा गव्यांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची चिंता वाढली असून, दुचाकीवरून प्रवास धोकादायक बनला आहे.
वाल्मीक पठारावरील अनेक गावांचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला आहे. डोंगरदऱ्या, घनदाट जंगले यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मांईगडेवाडीवरून ढेबेवाडीकडे येणाऱ्या या एकमेव रस्त्यावर कन्हाड आगाराची एसटी बस सुरू आहे. शिवाय खासगी वहापही आहे. निगडे गावच्या ओड्याजवळ गळ्यांचा सतत वावर असून, अचानक हे गवे वाहनांच्या आडवे येत आहेत.
चालकाला ढेबेवाडी विभागात दक्षिणेच्या बाजूला असलेल्या वाल्मिक पठारावरील गावाकडे जाण्याचा कुठरे, पवारवाडी, जाधववाडी मार्गे मत्रेवाडी घाटातून वाल्मीक पठारावरील मत्रेवाडी, निवी, कसणी, घोटील, निगडे, माईंगडेवाडी असा मार्ग आहे. या परिसरातील लोकांना दैनंदिन कामासाठी तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ढेबेवाडी, तळमावले व कराड याठिकाणी यावे लागते.
या परिसरातील काही गावांचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन नष्ट होत आहे