कराड प्रतिनिधी । पाणी आणि भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील मलकापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर नांदलापूर, जखिणवाडी, चचेगावसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह ५२ गावांत बिबट्याचा वावर आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मलकापुरातील लाहोटीनगर परिसरातील भर वस्तीतून शाळुच्या शेत शिवारातून बिबट्या संचार करत असल्याचे नागरिकांना दिसून झाले. या अघटनेमुळे नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगाशिव डोंगरालगत काही शेतकऱ्यांना बिबट्याच्या कळपाचे दर्शन काही दिवसांपूर्वी झाले होते. आसपासच्या गावात वारंवार घडलेल्या घटना व जखिणवाडीत विहिरीत पडलेले दोन बिबट्याचे बछडे, त्याच पध्दतीने गेली काही दिवसांपूर्वी समर्थनगर येथे सुरेश गणपतराव इंगवले यांच्या ऊसाच्या शेतात दोन बछडे आणि एक मादी बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते.
मलकापूरातील लाहोटीनगरमधील भरवस्तीतून बिबट्याचा मुक्तसंचार pic.twitter.com/uNjO8lYn6V
— santosh gurav (@santosh29590931) March 24, 2024
दरम्यान, लाहोटीनगर परिसरातील गणेश रेसिडेन्सी या इमारतीजवळ शेलार यांची शाळुची शेती आहे. या परिसरात चारी बाजुने इमारती असून मध्येच शेती आहे. या मोकळ्या शेतातूनच रविवारी सकाळी सात वाजता बिबट्या इकडून तिकडे पळत असल्याचे निदर्शनास आले. इमारतीवरूनच काहींनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा पळतानाचा व्हिडीओ चित्रित केला. यावेळी सकाळी नागरिकांमध्ये उडालेल्या एकच गोंधळाच्या आवाजाने बिबट्याने शाळुच्या राणात धूम ठोकली. भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.