शेअर मार्केटमधून नफ्याचे आमिष दाखवून दोघांनी एकास 3 लाखांचा घातला गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदन अधिक नफ्याने आमिष दाखवून एकास तीन लाखाला गंडा घातल्या प्रकरणी तेलेनाडी नाडे, ता. पाटण येथील एका महिलेला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयित किशोर शिवलिंग माळी व प्रतीक्षा शिवलिंग माळी (दोघेही रा.तेलेवाडी, नाडे, ता.पाटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक्षा माळी हिला पोलिसांनी रविवारी अटक केली.

मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद शंकर यशवंत मोळावडे (रा. नाडे) यांनी दिली आहे. संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादी शंकर मोळावडे यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवले. फिर्यादीकडून ३ लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे म्हटले.आहे. यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वेताळ करत आहेत.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून नवारस्ता येथील अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. तर याबाबतच्या तक्रारी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत असून आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.