कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. मात्र, पावसाअभावी धरणांत पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे. कोयना धरणात आज (शनिवार) केवळ 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात चिंताजनक पाणीसाठा उरला असल्यामुळे कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा पाण्याविना बंद करण्यात आला आहे.

सध्या जून महिन्याचे 15 दिवस संपले तरी अद्याप पावसाचे चिन्ह काही केल्या दिसत नाही. पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठी दिवसेंदिवस कमी हाेऊ लागला आहे. पावसाअभावी जूलै महिन्यात जिल्ह्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शहरात तर पालिकेने नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पाणी पुरवठ्यात कपात केली आहे.

राज्यात वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार आज (शनिवार) काेयना धरणात 11 टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. सिंचनासाठी कोयना धरणातून १०५०, धोम धरणातून ५९९, धोम-बलकवडी २५, कण्हेर ४३०, उरमोडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा पाण्याविना बंद करण्यात आला आहे.