चारचाकीमुळे जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार लाडक्या बहिणींची नावे कमी

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. मात्र आर्थिक सक्षम, चारचाकी वाहन, शासकीय नोकरदार महिलाही याचा लाभ घेत आहेत. शासनाच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील 14 हजार 868 लाडक्या बहिणी कुटुंबात किंवा तीच्या नावावर चारचाकीची नोंद आहे. त्यांची नावे योजनेतून कमी करण्यात आली आहेत. तसेच इतर शासकीय योजनांव्दारे दुहेरी लाभ घेणार्‍या लाडक्या बहिणी आता शासनाच्या रडारवर असून पुढील काळात त्यांचीही नावे या योजनेतून कमी होणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यामागे गरीब कुटुंबातील गरजू महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याचा उद्देश असून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे शासनाच्या समोर आले आहे. योजनेच्या प्रारंभीच्या काळात शासकीय कर्मचारी, तसेच चारचाकी वाहन असलेल्या, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या कुटुंबातील महिलांनीही या योजनेचे अर्ज भरले असून लाभही घेत आहेत. कुटुुंबात किंवा स्वत: महिलेच्या नावे चारचाकी गाडीची नोंद असलेल्या जिल्ह्यात 11 तालुक्यात एकूण 14 हजार 868 लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. त्यांची नावे या योजनेतून कमी झाली आहेत.

काहीच दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी असलेल्या 2 हजार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. मात्र ही यादी अद्याप जिल्हास्तरावर पोहचली नसली तरी पुढील काही दिवसांमध्ये ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या इतर योजनांसह लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या महिला आता शासनाच्या रडारवर आहेत.