कोयना धरणाचे चार दरवाजे बंद, दोन दरवाजांतून विसर्ग कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. ३० ऑगस्ट २४ रोजी सायंकाळी ५:०० वा. धरणाचे दोन वक्र दरवाजे १ फूट ३ इंच ठेवून उर्वरित ४ वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सांडव्यावरून ३,७६२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आवक पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५,८६२ क्युसेक्स आहे.

धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असला तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

Koyna Dam
Date: 30/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2162’01” (659.003m)

Dam Storage:
Gross: 103.41 TMC (98.25%)
Live: 98.29 TMC (98.16%)

Inflow : 14,915 Cusecs.

Discharges
Radial Gate: 3,762 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.

Total Discharge in koyna River :5,862 Cusecs

Rainfall in mm -(Daily/Cumulative)
Koyna- 03/4966
Navaja- 00/5831
Mahabaleshwar- 01/5648