पाटण प्रतिनिधी । पाटण परिवनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञाताकडून रात्रीच्या वेळी वनवा लावण्याचे प्रकार केले जात होते. वणव्यामुळे हजारो वन संपत्ती जाळून खाक होत होती. अज्ञाताकडून डोंगरास लावलेली आगीचा वनवा परिसरातील आंब्याच्या बागेत शिरल्याने तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या अंब्रुळकरवाडी येथील वयोवृद्ध शेतकर्याचा आगीने होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या दरम्यान, वन विभागाकडून वानवा लावणाऱ्याचा शोध घेतला जात असताना आज पाटण वन परिक्षेत्रातील मौजे झाकडे या ठिकाणी राखीव वन क्षेत्रमधून एकास वानवा लावत असताना वन विभागाने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी येथे वनव्याने ओरपळुन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पाटण वन विभागाच्या वतीने वन परीक्षेत्रात रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना नितीन साळुंखे हा वणवा लावत असल्याची माहिती वन विभाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ओंवाळा वानवा लावल्यानंतर तिसऱ्या वेळेस वणवा लावत असताना वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार यांनी नितीन साळुंखे याचा सुरुवातीला मोबाईलवरती कॅमेऱ्यात व्हिडीओ शूट केला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.
नितीन साळुंखे याला ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाच्या वतीने त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, साळूंखे याने दोन ठिकाणी लावलेले वनवे ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच विझवल्याने मोठे वन क्षेत्र जळण्यापासून वाचले आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक अदिती भारदवाज , सहा.वनसंरक्षक महेश झांजूर्णे, वन क्षेत्रपाल पाटण श्री. राजेश नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.