पाटण प्रतिनिधी । कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गालगत पाटण तालुक्यातील तामकडे गावच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जॅकवेलनजीक अल्टो कार व आयशरची भीषण धडकी झाली. खेर्डीच्या (चिपळूण) दिशेने निघालेल्या अल्टोवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने विरूध्द दिशेला जाऊन कराडच्या दिशेने निघालेल्या आयशर माल वाहतूक ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात अल्टोमधील ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दि. १९ रोजी पंढरपूरहून कार्तिक वारी करून चिपळूण तालुका खेर्डी या गावी अल्टो गाडी (क्रमांक MH 08. AG 1165) मधून परेश दत्तात्रय अघटराव (वय ५२) हे कुटुंबियांसमवेत निघाले होते. अल्टो कार कराड – चिपळूण राष्ट्रीय महार्गावरील पाटणपासून ३ किलोमीटर अंतरावरील तामकडे गावच्या हद्दीत आली.
यावेळी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अल्टो कारमधील चालक परेश अघटराव यांच्या डोळ्यावर सूर्याची किरणे पडल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी विरूध्द बाजूला गेली. या अपघातात कारचालक परेश अघटराव यांच्यासह शामल परेश अघटराव (वय ४२), रामचंद्र देवजी मुकनाक (७५), श्रीराम जयराम महाडिक (७८, काडोली, ता. चिपळूण), – सुनीता मधुकर चाळके (६५, रा. लोटे, – ता. चिपळूण) असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी गाडीने पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, अपघातातील ट्रकचालक नागेश माने (रा. कोल्हापूर) हे देखील किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, खेर्डी येथीलच परेश अधटराव यांचे मित्र अभिजित नालंग हे कोल्हापूरवरून खेर्डीकडे जाताना अघटराव यांच्या अपघाताची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली. या अपघाताची माहिती समजताच पाटणचे पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सदगर, पोलिस हवालदार राजेंद्र पगडे, ए.एन. आढावे, एम.डी. लोंढे, वैभव पुजारी, संतोष कुचेकर, संतोष माने, वाहतूक हवालदार हणमंत नलवडे 5 यांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी करत पंचनामा केला.
त्याचबरोबर रस्त्यावरील वे अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघाताची नोंदी सायंकाळी उशिरा पाटण पोलिसांत दाखल करण्याचे काम सुरू होते. यांचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे, पोलिस निरीक्षक अविनाश 5 कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलिस करत आहेत.