पाटण प्रतिनिधी | शेतामध्ये कोळपणी करत असताना एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रूक येथे घडली. ही त्याच्यावरती कराड येथे उपचार सुरू आहेत. मारुती बाबू थोरात असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रूक येथील मारुती बाबू ने थोरात (वय ५०) हे दिवशी पापर्डे मार्ग न लगत असणाऱ्या शेतामध्ये कोळपणी करत होते. शनिवार, दि. २९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पाठीमागून येऊन रानडुकराने त्यांना जोराची धडक देऊन जखमी केली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर पापर्डे येथेही त्याच दिवशी शेतामध्ये काम करत असलेल्या महिला व पुरुषावर याच रानडुकराने हल्ला केल्याने यामध्येही ते सुद्धा जखमी झाले आहेत. दिवशी गाव हे डोंगर परिसरामध्ये असल्याने या भागातील शेतीही डोंगर पट्टयात असून येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून, जीवावर उदार होऊन शेतीकाम करत असतात. या भागात अनेक वेळेला बिबट्याने हल्ले केले आहेत.
त्याचबरोबर गावात घुसून डुक्करसारखे, बिबट्या सारखे पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पडलेला आहे, असे असतानाही अनेक वेळेला येथील नागरिकांनी वनविभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा किंवा सापळा लावावा अशी मागणी केली आहे. आता रानडुकराने शेतकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.