सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत शेडनेट व हरितगृह उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेडनेट व हरितगृह या घटकांकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते. अटल भूजल योजनेच्या माण, खटाव, वाई व महाबळेश्वर या तालुक्यातील ११५ गावांमधील शेतकऱ्यांना या घटकांकरीता २५ टक्के अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.
शेडनेट व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपीक आणि भाजीपाला पिकांचे कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेता येते. ज्या शेतकऱ्यांची जमीन धारणा दोन हेक्टर पर्यंत आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या घटकांचा लाभ घेण्याकरिता महा डी.बी.टी.(Mahadbt ) या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी सबंधित तालुका कृषी विभागास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.