सातारा प्रतिनिधी । उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करतात. त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग कीड नियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. दर चांगला असला तरी सध्या फुलकिडीमुळे मिरचीचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
सातारा जिल्ह्यात इतर पिकांप्रमाणे हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणारे शेतकरी देखील जास्त आहे. त्यांच्याकडून देखील हिरव्या मिरचीचे उत्पादन घेऊन तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केली जाते. सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे दर देखील वाढले असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, फुलकिडी रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. सातारा बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीला पार्टी क्विंटल ३००० हजर रुपये तर कराड आणि पाटण कृषी उत्प्प्न बाजार समितीमध्ये २५०० रुपये इतका दर मिळत आहे.
फुलकिडी रोखण्यासाठी काय कराल?
मिरचीतील तण काढणे, खत देणे आणि मुळांभोवती माती चांगली करणे आवश्यक आहे. प्रारंभीला दर पंधरा दिवसांनी तण काढणे आवश्यक असते तसेच, औषध फवारणी करायला हवी.
ठिबक, मल्चिंगवर मिरची लागवड
गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर पाणी उपलब्ध राहिले पाहिजे, या उद्देशाने शेतकरी ठिबकवर लागवड करत आहेत. तसेच, मिरचीवर कुठलाही रोग पडू नये, यासाठी मल्चिंगचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
‘या’ रोगांचा जास्त प्रादुर्भाव
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मावा, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. फुलकिडीचे पिले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात. ही कीड पाने खरबडून त्यातून बाहेर नेणारा रस शोषून घेतात. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
उन्हाळी मिरचीला भाव
सध्या उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली नाही. मात्र, आगामी १५ ते २० दिवसांत उन्हाळी मिरचीची शेतकरी लागवड करणार भर देणार आहेत. सध्या बाजारात ठोक ५० ते ६० रुपये किलो तर क्विंटलमध्ये आठ हजार रुपये भाव आहे.
कमी कालावधीत जास्त उत्पन्न
उन्हाळी मिरचीला चांगला भाव राहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी मिरचीची लागवड करतात. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळते तसेच, उन्हाळी मिरची वर्षभराची कमाई करून देत असल्याने सर्वाधिक शेतकरी मिरचीकडे वळले.
मिरचीला रोगापासून वाचवण्यासाठी ‘हा’ करा उपाय
मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या रोपावर अवलंबून असते. रोप तयार करण्यासाठी ३ x २ मी. लांबी-रुंदीचे आणि २० सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. उगवण झाल्यावर पाच ते सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.
हिरव्या मिरचीचे पौष्टिक मूल्य
पोषक घटक : प्रति १०० ग्रॅम प्रमाण
कॅलरीज : ४० किलोकॅलरी
कार्बोहायड्रेट्स : ८.८ ग्रॅम
प्रथिने : १.९ ग्रॅम
जाड : ०.२ ग्रॅम
आहारातील फायबर : १.५ ग्रॅम
व्हिटॅमिन सी : २४२.५ मिग्रॅ
व्हिटॅमिन ए : ५३० आययू
व्हिटॅमिन के : १४ μg
व्हिटॅमिन बी ६ : ०.५ मिग्रॅ
फोलेट (व्हिटॅमिन बी९) : २३ मायक्रॉन
लोखंड : १.२ मिग्रॅ
मॅग्नेशियम : २३ मिग्रॅ
पोटॅशियम : ३४० मिग्रॅ
कॅल्शियम : १८ मिग्रॅ