सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील रहाटणी येथील प्रगतीशील शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी ४० गुंठ्यामध्ये १२९ टन एवढे आडसाली लागणी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. या गावातील सर्वांत जास्त उत्पन्न या शेतकऱ्याने काढले आहे.
या परिसरातील गावाना उरमोडी पोटपाटाच्या पाण्याचे वरदान लाभले आहे. यामुळे या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने त्यांनी या ऊस शेतीला ठिंबक सिंचन करून ८६०३२ या उसाची जून महिन्यात आडसाली लागण केली.
यावेळी ऊस लागणी करताना जादा उत्पन्न काढण्याचा मानस ठेवून मोठी मेहनत घेतत्यांनी आडसाली उसाला शेणखत व कोंबड खत, लिंबोळी पेंड यासह रासायनिक- खतांचा वापर योग्य प्रकारे वापर करून वेळोवेळी जैविक फवारणीचा अवलंब करून स्वतः बॅलरमध्ये खत मिसळून आळवणी व फवारणी केली. मागील वर्षी ही उसाचे जादा उत्पन्न काढले होते, या ही वर्षी जादा उत्पन्न काढल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.