सातारा प्रतिनिधी । कोयना सिंचन विभाग कोयनानगर विभागांतर्गत कोयना, तारळी, उत्तरमांड, उत्तरवांग, वांग नदी, मध्यम प्रकल्प येतात. अशा प्रकल्पासह ल.पा. तलावांवर पाणी परवाना व विद्युत उपसा यंत्र परवाना मंजुरी घेणाऱ्या सातारा जिल्हयातील पाटण, कराड, सातारा तालुक्यातील, सातारा जिल्हयातील कराड व पाटण तालुक्यातील सर्व लाभधारक, बागायतदारांचे, ग्राहकांचे मे २०२४ अखेर कार्यान्वित न झालेले पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने रद्द करण्यात येणार आहेत. तसेच शेतकरी / लाभार्थ्यांना ७/१२ व खाते उतारे मिळण्यास व पाणीपट्टी भरण्यास कमी कालावधी मिळाल्याचे काही सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या विनंतीवरुन दि. २० मार्च २०२५ अखेर मुदतवाढ देणेत येत आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
जे शेतकरी वारसा हक्काने मिळालेले उपसा परवाने पाणीपट्टी भरुन आपले नावे वर्ग करुन परवाने नियमित करणार नाहीत, असे परवाने रद्द करण्याकामी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळास वीज खंडीत करणेकामी कळविणेत येतील. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार रहाणार नाही, अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आलेली आहे.
कोयना सिंचन विभाग हे महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाचा एक विभाग असून कोयना नदी, तारळी नदी, उत्तरमांड नदी, वांग नदी, उत्तरवांग नदी आणि या नद्यांवरील बंधारे यांचे व्यवस्थापन कोयना सिंचन विभागाकडे आहे. सह्या या विभागाच्या वतीने सहकारी संस्था व शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यास २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.