विकसित भारत यात्रेचे ग्रामीण जिल्ह्यात उत्साहात स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज पाटण तालुक्यातील दिवशी बु. आणि पापर्डे तसेच खटाव तालुक्यात भोसरे येथे ग्रामस्थांनी उत्साहात यात्रेचे स्वागत केले.

दिवशी बु. येथे ३ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलाचे मंजुरीपत्र देण्यात आले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत ज्योतिबा व पवनायी देवी बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जाचे प्रत्येकी ५ लाख रुपयांचे धनादेश तसेच लघुउद्योजक युवक प्रवीण सूर्यवंशी यांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून मंजूर १५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. भोसले येथे २ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलाचे मंजुरीपत्र देण्यात आले.

लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप, धान्य वाटप, पोषण आहार वाटप आदी विविध उपक्रम घेण्यात आले. गटातील महिलांनी ‘मेरी कहाणी मेरी जुबानी’ उपक्रमांतर्गत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बँकांचे शाखा व्यवस्थापक, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.