पाटण प्रतिनिधी । राजकीयदृष्टया स्थानिक पातळीवर महत्वाच्या असलेल्या पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रमी निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, थेट सरपंच पदासह सदस्य पदांसाठी पंचवार्षिक आणि २४ ग्रामपंचायतींमधील सदस्य व सरपंच या रिक्त पदांसाठी पोट निवडणुका होत आहेत. रविवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
पाटण तालुक्यातील मरळी, बेलवडे खुर्द, कुसरुंड, डावरी, चौगुलेवाडी, कळकेवाडी, गव्हाणवाडी, मंद्रळकोळे, मंदुळकोळे खुर्द, उधवणे, निवी, रुवले, जिंती, मल्हारपेठ, नारळवाडी, जमदाडवाडी, नवसरवाडी, येराडवाडी, शितपवाडी, रामिष्टेवाडी, केर, होत गावडेवाडी, गमेवाडी, किल्ले मोरगिरी, गुंजाळी, गाडखोप या २६ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक डी होणार असून, तालुक्यातील सांगवड, सोनावडे, पाळशी, मराठवाडी, कोळेकरवाडी, मंदुळहवेली, नाडोली, घोटील, घाणबी, वाटोळे, खोनोली, काहीर, कराटे, गोठणे, भारसाखळे, चाफोली, असवलेवाडी, तोंडोशी, वेखंडवाडी, साईकडे, मान्याचीवाडी, काढणे, पाचपुतेवाडी, चाळकेवाडी या २४ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक नोटीस प्रसिद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. १६ ते २० ऑक्टोबर यादरम्यान सकाळी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. २३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज छाननी, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी जाहीर होणार आहे. रविवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० यावेळेत मतदान आणि सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दि. ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तब्बल 198 सदस्य पदासाठी होणार निवडणूक
पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका होणार असून, यामध्ये थेट सरपंच पदासाठी २६ व सदस्य पदांसाठी २८ प्रभागांमधून १९८ पदांची निवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये २४ ग्रामपंचायतींतील २७ प्रभागांमधून २७ सदस्य व थेट सरपंच पदासाठी ग्रामपंचायत भारसाखळे अनुसूचित जमाती प्रवर्ग व मान्याचीवाडी येथे नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग अशा दोन पदांसाठी आहे.