कोयनानगर भूकंपाने हादरला; रात्री बसला 2.5 रिश्टर स्केलचा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला. रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात बसला. परिसराला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 किलोमीटर हेळवाक गावाच्या 6 कि.मी अंतरावर होता. या भूकंपानंतर घरातील नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.