दुसऱ्या फेरीत कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले तर उत्तरेत मनोज घोरपडे आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून भाजप कडून डॉ. अतुलबाबा भोसले आघाडीवर असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर गेले आहेत.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी विविध १४ पथके स्थापन करण्यात आली असून १४ टेबलावरून मतमोजणी केली जाते आहे. तर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 20 टेबलवरून 17 ते 18 राउंड मध्ये केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या फेरीत बूथ कर्मक 21 ते 40 वरुण मतमाओजणी सुरू असून या ठिकाणी 7431 मते डॉ. अतुलबाबा भोसले यांना मिळाली 6397 इतकी मते पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली आहेत.

कराड उत्तर विधानसभा निवडणुकित भाजप महायुतीकडून मनोज घोरपडे तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी मनोज घोरपडे यांना दुसऱ्या फेरीत 11587 मते पडली असून बाळासाहेब पाटील यांना 5868 मते पडली आहेत.

दरम्यान, कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची तिसरी फेरी नुकतीच पूर्ण झाली असून या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 3 फेरीअखेर बाळासाहेब पाटील यांना 9485 मते मिळाली आहेत तर मनोज घोरपडे यांना 16829 पडली आहेत. या फेरीत 7344 मतांनी मनोज घोरपडे आघाडीवर आहेत.