सातारा प्रतिनिधी | हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिह्यातील धोम-बलकवडी धरणाचे तीनही दरवाजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अर्धा मीटर उघडण्यात आले. आता धरणातून 870 व वीजगृहातून 330 असा एकूण 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धोम-बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोढवली, नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाणात वाढ होत असून धरणामध्ये पाण्याची आवक 1800 क्युसेक झाली आहे. धरणाची पाणी पातळी. 809.72 मीटर झालेली आहे. बलकवडी धरणातून. आज 16:00 वाजता 1200 क्युसेकचा सुरु असलेला विसर्ग वाढवून 1500 क्युसेक करण्यात येणार आहे.
बलकवडी धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील प्रशासकीय यंत्रणेने सर्तक राहून ग्रामस्थानां नदी पात्रात न जाणे बाबत सूचना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जनजीवन विस्कळीत होऊन नद्यांना पूर आले आहेत. दरडी कोसळण्याचेही प्रमाण वाढले आहे.
धोम – बलकवडीतून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ pic.twitter.com/VsEiZRAwhg
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 23, 2023
नुकतीच महाबळेश्वर तालुक्यातील घावरी – एरणे रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 113, नवजाला 140, तर महाबळेश्वरला 127 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद 29 हजार 338 क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीसाठय़ात 24 तासांत 2.64 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 46.76 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.