पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टीच्या काळात पाटण तालुक्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. त्यामुळे पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. अनेकजण पुराच्या पाण्यात अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाटणमधील स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नुकतेच कोयना नदीत बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आदी नैसर्गिक आपत्ती काळात सामना करण्यासाठी पाटण तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडून स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक बोट आणण्यात आली. यावेळी कोयना नदीत पथकातील जवानांनी नागरिकांना बोट कशा प्रकारे चालवायची?, नदीत पूर आल्यास स्वतःचा बचाव कशाप्रकारे करायचा? पोहता येत नसेल तर कोण कोणत्या साधनांचा बचावासाठी वापर करायचा आदी विषयी आपत्ती व्यवस्थापन विभागातील पथकातील प्रशिक्षकांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी नागरिकांना पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार अनंत गुरव, प्र. नायब तहसीलदार, कराडचे संजय अडसूळ, अविनाश तोडकर, विलास गवाले, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, मंडलाधिकारी, कोयना नदीकाठावरील विविध गावचे तलाठी, सरपंच, ग्रामस्थ प उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आपत्ती व्यवस्थापन विभागास सूचना
गट आठवड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत त्यांनी महत्वाच्या सुच देखील केल्या. मान्सून कालावधीत मनुष्य व पशुहानी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. सर्व गटारे स्वच्छ करावीत. नेहमी पूर येणाऱ्या भागात अधिकची काळजी घ्यावी. स्वच्छता मोहिम राबविताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.
पावसाळ्यात पाटणला पुराचे साम्राज्य
पाटण तालुक्यात पडणारा पाऊस व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. त्यामुळे पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. केरा पुलानजिक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभूमी परिसर, केरा पुलापासून ते जुना बसस्थानक, झेंडाचौक, बांडे पूल, नवीन बसस्थानक, कळके व्यामुळे चाळ, रामापूर, ग्रामपंचायतीची राण्याने जुनी इमारत, मार्केट यार्ड परिसर असा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली जात असतो. तसेच कोयना नदीकाठावरील मुळगाव, येराडसह अनेक गावांना या पुराचा फटका बसत असतो. अनेकजण पुराच्या पाण्यात अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.