कृषी विभागाने काढली वडजलपासून फलटणपर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे औचित्य साधून फलटण, जिल्हा सातारा येथे शेतकर्‍यांना विविध योजनेची माहिती देणारे चित्ररथ व दिंडीच्या माध्यमातून कृषी योजनेचा शेतकर्‍यांमध्ये जनजागृती उपक्रम जिल्हा कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आला. यावेळी फलटण कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वडजलपासून फलटण कृषी कार्यालयापर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी काढली.

यावेळी काढलेल्या या दिंडीमध्ये पाणी वाचवण्याचा संदेश घेऊन सहभागी असलेले विठ्ठल-रुक्मिणी लोकांचे खास आकर्षण ठरले. कृषी विभागाच्या वतीने काढलेल्या या दिंडीला शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी अधिकाऱ्यांनी वारकरी शेतकऱ्यांना अनेक कृषी विषयक योजनांची माहिती देखील दिली.

कृषी विभागाच्या या अनोख्या जनजागृती कृषी योजना माहिती जनजागृती दिंडीमध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व उपविभागीय कृषी अधिकारी फलटण सुहास रणसिंग व दत्तात्रय गायकवाड तसेच मंडल कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.