कराड प्रतिनिधी । कोरेगावात पाच वर्षात आमदार महेश शिंदे यांनी विकासकामे केली. अंतर्गत गटारे बांधली, सीमेंट कोंक्रीटचे रस्ते केले. माग त्याठिकाणी होत असतील तर आपल्याकडे कराड उत्तरेत आतापर्यंत का झाली नाहीत? असा सवाल करीत अशा निष्क्रिय व बिनकामाच्या आमदाराला अजून किती दिवस आपण उरावर सहन करणार आहोत. हे जर करायचे नसेल आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन आणायचे असेल तर निष्क्रिय आणि बिनकामाचा आमदार आपल्याला बदलावा लागेल, असे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी म्हटले.
भाजप कराड उत्तरच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेची सभा मिलिटरी अपशिंगे येथे पार पडली. यावेळी परिवर्तन यात्रेचे गावातील ग्रामस्थांनी, महिलांनी जोरदार स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी महायुतीचे जिल्हा समन्वयक सुनील पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील, सरपंच तुषार निकम, संजय निकम, आनंद साबळे, संतोष साबळे, विकास राऊत, पायल जाधव, अक्षय भोसले, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, आमदार, खासदार नसताना देखील आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील चार गावांच्या विकासासाठी ५२० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. आम्ही विकासकांच्या बाबतीत कधीच कमी पडणार नाही. आणि येथील निष्क्रिय आमदार आम्हाला सारखं बोलत असतात कि निवडणूक आल्या कि भाजपचे कार्यकर्ते सारखं फिरत असतात. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वाचा विचारायचे आहे कि गेल्या पाच वर्षात असा एक दिवस सांगा कि आम्ही कुठल्या गावात गेलेलो नाही. गावात न जाता आम्हाला गावाची कामे कळतील का? नाही करणार ना? आम्ही माहिती घेतली आणि विकासकामला निधी दिला आहे.