शामगावात भाजप परिवर्तन यात्रेच्या सभेत धैर्यशील कदमांनी नाव न घेता बाळासाहेब पाटलांवर साधला निशाणा; म्हणाले, बिनकामाचा आमदार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । हणबरवाडी- धनगरवाडी हि योजना पूर्ण व्हावी हे कुणाचे स्वप्न होते? ते स्वप्न आदरणीय पीडी पाटील साहेब यांचे होते. पी. डी. पाटलांचा मुलगा गेली पंचवीस वर्षे कराड उत्तरचा आमदार आहे. जो गेली २५ वर्षे आमदार आहे तो माणूस आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तो शामगावकरांचे व कराड उत्तर तालुक्याचे स्वप्न काय पूर्ण करणार आहे?, असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना केला.

कराड उत्तर भाजपा वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेची सभा कराड तालुक्यातील शामगाव येथे शनिवारी पार पडली. यावेळी कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, सातारा भाजप उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, रामकृष्ण वेताळ, शंकरकाका शेजवळ, भारत जंत्रे बापु, पंचायत समिती साताराचे सदस्य संजय घोरपडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर शामगावाला कधी उचलून पाणी येईल याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता. गेली पंचवीस वर्षे एकाच व्यक्ती कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचा या शामगावचा आमदार आहे. त्यांच्या अगोदर वडील दहा वर्षे आमदार होते. ३५ वर्षे आमदारकी एकाच घरात आहे. त्यांना हि आमदारकी कुणी दिली असेल तर ती आपणच दिली आहे. मात्र, या विद्यमान आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षात शामगावच्या पाणी प्रश्नामध्ये कधी हात घातला नाही. शंगावच्या महिलांसह पुरुषांनी घराला कुलूप लावून शामगाव ते कराडच्या तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत मोर्चा काढला, चूल बंद आंदोलन केले आणि वर्षभरानंतर आमरण उपोषण देखील केले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे शामगावला पाणी द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर आम्ही पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांनि उपोषणास भेट दिली. त्यांच्या अगोदर ज्यांना आपण मते दिली ते आमदार उपोषणास भेट यायला आले. त्याच्याकडे ग्रामस्थांनी जेव्हा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली तेव्हा या विद्यमान आमदाराने माझ्याकडून हा पाणी प्रश्न माझ्याकडून काही सुटणार नाही तुम्हाला जे पाणी देतील त्यांच्याकडून पाणी प्रश्न सोडवून घ्यावा, असे उत्तर विद्यमान आमदारांनी दिले. शामगाव हे कराड कराड तालुक्यात आहे आणि कराडच्या कृष्णा नदीवर टेम्भू धरण आहे.टेम्भू मधून १८० कि. मीटर पाणी वाहून सांगोला, आटपाडी, विट्या सारख्या भागाला दिले जाते, असे कदम यांनी यावेळी म्हटले.

मंत्री असून देखील शामगावचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही

जेव्हा आमदार जयकुमार गोरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली तेव्हा आम्ही सर्वानी त्यांच्याकडे शामगावचा पाणी प्रश्न सोडवावा, टेम्भूचे पाणी देण्यात यावा, अशी मागणी केली. आमच्या मागणीनुसार सर्वानी प्रयत्न केले. मात्र, या मतदार संघातील एकमेव स्थानिक आमदाराने प्रयत्न केले नाहीत. दि. २४ तारखेला शासनाकडून एका जीआर आला तो म्हणजे शामगावाला पाणी मिळणेबाबतचा. याचाही माहिती मिल्यानंतर विद्यमान आमदाराने रातोरात बातमी दिली. यांना लाज कशी वाटली नाही. २५ वर्षे तुम्ही आमदार आहे, अडीच वर्षे तुम्ही कॅबिनेट मंत्री होता राज्याचे सहकारमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री होता. तेव्हा जर प्रयत्न केले असते तर त्याच काळात टेम्भूचा पाणी प्रश्न तुम्हाला सुटला असता. मात्र, तुम्ही तस केलं नाही. तुम्हाला शामगावचा पाणी प्रश्न सोडवायचाच नव्हता, तुम्हाला पाणी द्यायचेच नव्हते, अशी टीका कदम यांनी यावेळी केली.

बिनकामाच्या आमदाराला कायमचे घरी घालवा

आता शामगावला जे पाणी मंजूर झाले आहे ते आणायचे असेल तर महायुतीचे सरकार आणावे लागेल. त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदार संघात जो हा बिनकामाचा आमदार आहे त्याला घरी घालवून आपल्या भाजपचा आमदार निवडून आणावा लागणार आहे. त्यासाठी शामगावकरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कदम यांनी केंले.

काहींचं अर्धा किलो चिकन महत्वाचं कि लाडकी बहिणीचे पैसे हे महिलांनी ठरवावं…

या लोकांना फक्त माफ काढायची माहिती आहेत द्यायचे काही माहिती नाही. त्यांची बँक हि लेना बँक असून महायुतीची बँक हि देना बँक आहे. लोकांना, शेतकऱ्यांना भरभरून देणारी बँक आहे. काही गडी निवडणुकीच्या आदल्या दिवशी येतात आणि अर्धा किलो चिकन देऊन मला मते द्या असे म्हणतात. मात्र, माता भगिनींना मिळणारे लाडकी बहिणचे पैसे, श्रेष्ठ नागरिकांना मिळणारे अर्थसहाय, शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीतून मिळणारे पैसे महत्वाचे कि यांचं अर्धा किलो चिकन महत्वाचं आहे आता जनतेने ठरवायचे आहे, असा टोला जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी नाव न घेता आमदार बाळासाहेब पाटील यांना लगावला.