आम्ही ठरवलंय कराड उत्तरेत परिवर्तन करणारचं; वाठारच्या सभेत परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील वाठार किरोली येथे परिवर्तन यात्रेअंतर्गत जाहीर सभा पार पडली. या सभेत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी जोरदार भाषण केले. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये तिरंगी लढत झाली. त्यानंतर २०१९ मध्ये देखील तिरंगी लढत झाली. यामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. आता आम्ही ठरवलं दोघांचं भांडण लागू द्यायचे नाही. महायुतीचा जो उमेदवार असेल जो तुमच्या योजनांचे काम पूर्ण करू शकेल अशा उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्याला निवडून आणायचे आहे आणि कराड उत्तरेत कोणत्याही परिस्थिती परिवर्तन घडवून आणायचेच, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

वाठार किरोली येथे पार पडलेल्या परिवर्तन यात्रेच्या व भूमिपूजनाच्या कार्यक्रमास देखील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी आमदार जयकुमार गोरे,कराड उत्तर विधानसभा प्रमुख मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते गुरुवर्य भीमराव काका पाटिल, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश माने, आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तरमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन रॅली कराड उत्तर भागात गावागावात जात आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेस नागरिक, महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कराड उत्तरमधील बिनकामाचा आमदार बदलावा लागेल…

यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, शासनाच्या सर्व काही योजना आपल्याला घ्यायच्या असतील तर करा उत्तरेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. या योजना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे सरकार देऊ शकत नाही. अनेक राज्यात लाडकी बहीण योजना हि बंद पडल्या. मात्र, महाराष्ट्रात हि योजना सुरु आहे. राज्यात भाजप आणि महायुतीचे सरकार आपल्याला पुन्हा आणायचे आहे. हे सरकार आणण्याचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी घ्यावी लागले. त्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार सांगता बिनकामाचा आमदार बदलावा लागेल.

विकासकामांच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या आमदाराला घरी बसवण्याची वेळ : जयकुमार गोरे

माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गोरे म्हणाले, “कराड उत्तरच्या आमदारांना विकासकामे करण्याची संधी असूनही त्यांनी ती साधली नाही. मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. छोट्या गावांना देखील पाणी पुरवण्यात अपयशी ठरलेल्या आमदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.” यावेळी गोरे यांनी महायुतीच्या माध्यमातून टेंभू योजनेचे पाणी पाठपुरावा करून दिल्याचा दावा केला. त्यांनी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या स्वप्नातील हंबरवाडी धनगरवाडी योजनेसाठीही अपयशी ठरल्याचे सांगितले.