सातारा प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून १०९ जण रिंगणात होते. त्यापैकी तब्बल ९४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे वैध मतांच्या एकषष्ठांशही मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत असते. अवघ्या १५ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश मिळाले आहे मात्र, निवणुकीत नव्या दमाने उतरलेल्या उद्धव ठाकरेंच्या दोन्ही शिलेदारांना हर्षद कदम आणि अमित कदम यांना देखील आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही.
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीत डिपॉझिट जप्त म्हणजे मानहानिकारक पराभव समजला जातो. त्यामुळे अनेकदा त्यामुळे अनेकदा उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्याच्या गर्जना करत असतो. अनेकदा तुल्यबळ उमेदवारांनाही असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागतो.
लोकशाहीत कोणालाही उभे राहण्याचा अधिकार असतो. त्यामुळे अनेक हौशे-नवशेही निवडणुकीला उभे राहत असतात. परिणामी प्रशासनावरील ताणही वाढत असतो. डिपॉझिट रक्कम जप्त होत असल्यामुळे यावर काही प्रमाणात अंकुश राहतो. तरीही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रमुख उमेदवार मिळून १०९ जण रिंगणात होते. परंतु, विजेता आणि प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता इतरांचे डिपॉझिट जप्त झाले. साताऱ्यात विजेता वगळता कुणीही अनामत रक्कम वाचू शकले नाही.
नेमकं किती असते डिपॉझिट?
विधानसभा निवडणुकीत जप्त करण्यात येत असलेल्या डिपॉझिटची रक्कम हि संवर्गनिहाय जमा केले जाते. त्यामध्ये १० हजार रुपये हि रक्कम सर्वसाधारण वर्गासाठी असते. तर ५ हजार रुपये अनुसूचित जाती संवर्गातील उमेदवारासाठी आणि ५ हजार रुपये अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी असते.
‘बिग बॉस’ फेम बिचुकले यांचेही डिपॉझिट झालेय जप्त
यंदाच्या निवडणुकीत साताऱ्याचा ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील उमेदवार म्हणून यंदा दोन मतदारसंघांमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि आपला अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि साताऱ्यात अभिजित बिचुकलेना फक्त ५२९ मते मिळाली. त्यांचे देखील डिपॉझिट जप्त झाले आहे.
कोणत्या मतदारसंघात किती जणांचे डिपॉझिट जप्त?
फलटण विधानसभा मतदार संघ : १२ उमेवार
वाई विधानसभा मतदार संघ : १३ उमेदवार
कोरेगाव विधानसभा मतदार संघ : १५
माण विधानसभा मतदार संघ १९
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ : १३
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ : ६
पाटण विधानसभा मतदार संघ : ९
सातारा विधानसभा मतदार संघ – ७
कोणत्या निवडणुकीत किती डिपॉझिट?
1) लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला सुरक्षा ठेव म्हणून 25,000 रुपये जमा करावे लागतात. ही रक्कम सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारासाठी आहे. त्याच वेळी, एसटी, एससी श्रेणीतील उमेदवारांना 12,500 रुपये जमा करावे लागतात.
2) विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला 10 हजार रुपये आणि एसट, एससी प्रवर्गातील उमेदवाराला 5 हजार रुपये जमा करणे आवश्यक आहे.
3) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रवर्गातील उमेदवाराला समान रक्कम जमा करावी लागते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 15,000 रुपयांची रक्कम जमा करावी लागेल.