सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा 60.04 टक्क्यांवर पोहोचला असून जुलै महिन्यापर्यंत सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्यातच दुष्काळी तालुक्यातील सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले होते. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगर रांगात धबधबे प्रवाहीत झाले होते. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कोयना धरणात पाणीपातळी 646.28 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 56.410 टीएमसी असून 56.34 टक्के पाणी पातळी आहे तर धरणात 32 हजार 437 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 37.17 टक्के पाणी जास्त आहे. धोम धरणात पाणीपातळी 741.43 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 7.100 टीएमसी असून 60.74 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 308 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 36.83 टक्के पाणी जास्त आहे.धोम बलकवडी धरणात पाणीपातळी 794.53 मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा 1.540 टीएमसी असून 38.89 टक्के पाणी पातळी आहे.
रणात 1 हजार 440 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 34.09 टक्के पाणी जास्त आहे. कण्हेर धरणात पाणीपातळी 686.05 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 6.780 टीएमसी आहे. या धरणात 70.70 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 3 हजार 866 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. 2 हजार 997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 48.07 टक्के पाणी जास्त आहे. उरमोडी धरणात पाणीपातळी 690.83 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 6.920 टीएमसी आहे. 71.71 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 642 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 2 हजार 191 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 59.38 टक्के पाणी जास्त आहे. तारळी धरणात आजची पाणीपातळी 704.80 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 4.620 टीएमसी आहे. आजची 79.11 टक्के पाणी पातळी असून धरणात 1 हजार 850 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 56.68. टक्के पाणी जास्त आहे.