सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी, तक्रार नोंदविण्यासाठी दक्ष अभियानाअंतर्गत ‘दक्ष २.०’ ही व्हॉट्सअप प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या व्हॉट्सअप प्रणालीचा नंबर ९९२३२३४१०० हा असून या प्रणालीद्वारे दक्ष व जागरुक नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती सहजरित्या पोलिसांपर्यंत पोहोचविता येणार आहे.
सातारा पोलीस ‘दक्ष २.०’ च्या मदतीने अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. तरी नागरिकांना कोणत्याही अवैध धंद्याबद्दल किंवा अवैध कारभाराबद्दल माहिती द्यावयाची असल्यास नागरिकांनी दक्ष या प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदणी करावी, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.