कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या दिवसांपासून चारचाकी गाड्या चोरून त्यांची बनावट आरसी बुक तयार करून एक टोळीकडून विक्री केली जात होती. अशा प्रकारे गंडा गाळणाऱ्या एका टोळीचा कराड येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून आज पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी कोल्हापुर व बेलवडे हवेली ता. कराड येथून 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रुपये किंमतीच्या चारचाकी 2 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
हर्षद पवार (वय 27) रा. कोल्हापूर, युवराज पाटील उर्फ कांबळे उर्फ हजारे (वय 32), रा. बेलवडे हवेली ता. कराड, तेजस सकपाळ (वय 23), रा. शनिवार पेठ कराड, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यात स्वीट गाडीची चोरी करुन तीचे बनावट आरसी बुक बनवुन गाडीची विक्री केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपी हे कोल्हापुर व कराड मधील असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक कोल्हापुर व दुसरे पथक कराड तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे रात्री उशिरा आरोपीना कोल्हापुर व बेलवडे हवेली ता. कराड मधुन ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपी कडुन एक मारुती सुझुकीची स्वीफट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा अशा एकुन 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे अधिक तपास करता नमुद आरोपीवर गाडीची चोरी करुन तीचे बनावट आरसी बुक गाडीची विक्री केलेबाबत इतर पोलीस ठाणेस देखील गुन्हे नोंद असल्याचे निष्पन झाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभुते, पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सफी देसाई, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संपोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.