“एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो… मै खुद की भी नहीं सुनता”; पाटणला कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पाटण तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर लाडक्या बहीण योजनेवरून निशाणा साधला. “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना या १५०० रुपयांची किंमत काय कळणार? माझ्या लाडक्या बहिणींना ती कळलीय. आमचं महायुतीचे सरकार हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. या सरकारची ताकद जर तुम्ही वाढवली कि १५०० हजारचे पुढे २ हजार होतील, २ हजारचे ३ हजार होती. विरोधक म्हणतायत ही योजना बंद पडेल खूप दिवस चालणार नाही. मात्र, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही. कुणीही मायकलाल हि योजना बंद पाडू शकणार नाही. आम्ही हि योजना मतांसाठी सुरु केली नसून लाडक्या बहिणींची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केली आहे. लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन होय. सर्वांना एकाच सांगतो हे सरकार तुमचं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरची घटना झाली तेव्हा त्या नराधाला फाशी द्या असे विरोधक म्हणाले. मात्र, जेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला पोलिसांनी गोळी मारली. तेव्हा विरोधक म्हणाले कि कशाला गोळी मारली?. अशी दुट्टपी भूमिका मांडणारे हे विरोधक आहेत. प्रत्येक विकासकामांच्या विरोधात विरोधी भूमिका मांडणारे हे विरोधक आहेत. अशा विरोधकांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्या मतपेटीतून एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाहीत, असा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.

पाटण येथील कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे  मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.