रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर झाला हल्ला; 70 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची घटना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील मराठवाडी येथे गुरुवारी घडली. या हल्ल्यामध्ये तब्बल ७० जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ढेबेवाडी भागातील मराठवाडी गावात नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी जवळ काही नागरिक गुरूवारी रक्षा विसर्जन करण्यासाठी गेले होते. याचवेळी जवळच असलेल्या मधमाश्यांनी या सर्वांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वजण घाबरुन गेले.

या हल्ल्यामध्ये ७० नागरिक जखमी झाले. त्यांना काही खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ढेबेवाडी विभागात एकच खळबळ उडाली आहे.