सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा, वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार आज दुपारी सैनिक स्कूलच्या मैदानावर कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दि. 17 ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 50 हजार महिलांचा मेळावा आज रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे.
कोणकोणते रस्ते बंद?
१) बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते बांधकाम भवन जिल्हा परिषदेसमोरील रस्ता हा वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करणेत येत आहे.
२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
वाहतुकीकरीता ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग
१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात येणारी वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील.
२) पोवई नाका बाजुकडुन बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडे जाणारी वाहने ही बांधकाम भवन येथुन आर.टी.ओ. कार्यालय, सैनिकनगर मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट चौक बाजुकडे रवाना होतील.
‘या’ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
१) ठक्कर सिटी- कराड, पाटण बाजुकडुन कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने ही ठक्कर सिटी येथील मोकळ्या जागेत पार्किंग होतील.
२) जुनी MIDC- कोरेगांव, रहिमतपुर, माण, खटाव बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जुनी MIDC मध्ये रस्त्याचे कडेला पार्किंग होतील.
३) शाहु स्टेडीअम – वाई, महाबळेश्वर बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही शाहु स्टेडीअम येथे पार्किंग होतील. ४) जिल्हा परिषद ग्राऊंड- सातारा शहर व मेढा बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही जिल्हा परिषद मैदान येथे पार्किंग होतील.
५) वाढे फाटा-खंडाळा, फलटण बाजुकडुन येणारी सर्व वाहने ही वाढे फाटा पासुन सर्व्हिस रोडला पार्किंग होतील. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे.