मित्रासोबत यात्रेसाठी जाताना चचेगावच्या विद्यार्थ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू; एकजण गंभीर जखमी

0
2743
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग येथे यात्रेसाठी मित्रासोबत गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा दुभाजकाला दुचाकी धडकून जागीच मृत्यू झाला तर अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला. विंग गावच्या हद्दीत कणसे मळा येथे सोमवारी अपघाताची घटना घडली.

रिहान शहानवाज खान (वय १६, केवस्ती, चचेगाव) असे जागीच
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र अभिनव दिनेश मोहिते (रा. आगाशिवनगर) हा जखमी झाला. दोघेही विंग येथील आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रिहान आणि अभिनव दोघे मित्र कऱ्हाडवरून दुचाकीवरून विंग गावाला यात्रेसाठी निघाले होते. कराड ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा येथील वळणावर रेहानचा दुचाकीवरचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली.

रिहानच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत्यू झाला. अभिनव हा गंभीर जखमी झाला. त्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांना उपचारासाठी तातडीने रग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच रिहानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघेही विंगच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी आहेत. रिहान मूळचा करंजे, सातारा येथील रहिवासी असून, तो चचेगाव येथील टाकेवस्तीत मामाकडे शिक्षणासाठी राहात होता.

अपघातानंतर रीहानचा मृतदेह कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर रिहानचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी अभिनव मूळचा पाटण तालुक्यातला उमरकांचन येथील रहिवासी असून, तो सध्या आगाशिवनगर येथे राहात आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. डी. भिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विठ्ठल खाडे, हवालदार एस. एस. गडाकुंश तपास करत आहेत.