कराड प्रतिनिधी | पतीने न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी पत्नीवर दमदाटी करून मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री कराडच्या कार्वे नाका येथे घडली. या प्रकरणात रेश्मा फिरोज मुजावर यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार फिरोज बाबालाल मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेश्मा मुजावर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या दोन खटल्यांमध्ये पती फिरोज मुजावर व तमन्ना जमशेद संदे यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. या खटल्यांमुळे त्यांना न्यायालयात वारंवार हजर राहणे भाग पडते.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास फिरोज मुजावर यांनी घरी येऊन पत्नीला खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला आणि त्यासाठी मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.