सातारा प्रतिनिधी । सातारा येथील विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सुतार समाजाचा महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी सुतार समाजातील महिलांचे एकीकरण सबलीकरण व्हावे, महिलांनी एकत्र येऊन आपले सबलीकरण आणि एकीकरण करावे तसेच महिलांच्या समस्या आदी विषयावर चर्चा करण्यात आली . दरम्यान, यावेळी महिलांची सातारा जिल्हा महिला आघाडी तयार करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा योगिता सुतार, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ सोनवणे, सावंत, सतीश सुतार, आबासाहेब महामुनी, शिवाजीराव सुतार, तुकाराम सुतार, रमेश बेलवडेकर, उज्वला सुतार, रवींद्र सुतार, दीपक सुतार, सुनील दीक्षित, चंद्रकांत सुतार, कल्पना सुतार, रूपाली सुतार, वर्षा सुतार, गीतांजली पंडित समाजातील सर्व महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुतार समाजातील महिला मेळाव्यात महाराष्ट्र शासनाने सुतार समाजातील पुरुष महिला युवक युवती यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी श्री. संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाच्या योजना काय आहेत? याबाबत माहिती देण्यात आली. तसेच उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.