पाटण प्रतिनिधी | पर्यटनस्थळी फिरण्यासाठी गेल्यावर काही अतिउत्साही तरुण मोबाईलवर फोटो काढण्यासाठी जातात. मात्र, फोटो, व्हिडिओ काढण्याच्या नादात त्यांचा जीव देखील जाण्याची शक्यता असते. अशीच घटना पाटण तालुक्यातील सडावाघापूर बुधवारी दुपारी घडली. सडावाघापूरला जाताना टेबल पाँईंटवरती गाडी खोल दरीत कोसळून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सडावाघापूर या ठिकाणी जात असताना टेबल पाँईंटवरती आज बुधवार, दि. 9 रोजी सायंकाळी 4 च्या दरम्यान साहिल अनिल जाधव (वय 20, रा. गोळेश्वर, ता. कराड, जि. सातारा) हा आपल्या मित्रांसमावेत फिरण्यासाठी आला होता. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान गाडीमध्ये साहिल जाधव बाळा होता. गाडीला ब्रेक लागला नसल्याने व गवतावरुन गाडी घसरत गेल्याने गाडी खोल दरीत कोसळली.
त्यावेळी मंगेश तुकाराम जाधव (रा. म्हावशी) हा बकरी चारण्यासाठी गेला असता आवाज आला आणि तो घटनास्थळी पोहचला दरीतून गाडीचा दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळी किंगमेकर अॅकॅडमीचे विकास संकपाळ, विद्यार्थी, अमित जाधव, पाटण पोलीस स्थानकाचे अधिकारी अविनाश कवठेकर, मोहिते, जय घाडगे, संकेत बापूराव घाडगे, टेबल पाँईटचे मालक परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. जखमीस उपचारासाठी सह्याद्री हाँस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले.