कराडनजीक पाचवड फाटा परिसरात कारने घेतला पेट; पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

0
1173
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा नजीक एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. आगीत कार जाळून खाक झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळाले माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास सातारा ते पुणे लेनवर कराड जवळ पाचवड फाट्या नजीक एका कारने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, सुनील कदम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारची पाहणी केल्यानंतर तसेच माहिती घेतल्यानंतर तात्काळ अग्निशामक विभागास फोन करून माहिती दिली.

माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीच्या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. या घटनेची नोंद पोलिसांकडून करण्याचे काम केले जात आहे.