ग्रीसींग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब तुकाराम ढमाळ (वय ५०, रा.केसुर्डी ता.खंडाळा) असे मृत ग्रीसींग व्यावसायिक मालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केसुर्डी ता.खंडाळा येथील दादासाहेब ढमाळ हे ट्रक, ट्रेलर आदी वाहनांचे मशिनच्या साहाय्याने ग्रीसींग करण्याचा व्यवसाय करीत होते. आज, सोमवारी ढमाळ हे असवली गावच्या हद्दीत एका खडी मशिनच्या डंपरला ग्रीसींग करीत असताना चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ढमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच केसुर्डी ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची प्रकाश ढमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करीत घटना खंडाळा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली.