मुंबईला 55 प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला कराडच्या तासवडे टोनाक्यावर भीषण आग

Karad Crime News 20231207 101513 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या तसेच अचानक पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका परिसरात घडली. या ठिकाणी मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली तर आगीत १५ ते … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या चोरीचा टेम्पो चालकच निघाला मास्टरमाईंड

20231206 211520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या तीन युवकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. … Read more

पोलिसांची तपासणी सुरु असल्याचे सांगत दोघांनी वृद्धाचे 3 तोळ्यांचे दागिने केले लंपास

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून अनेकांना अनेक कारणांनी गंडा घातला जात आहे. दरम्यान, अशी एक घटना साताऱ्यात घडली. ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून घेतली. या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. … Read more

कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी निधी मंजुरीचा धडाका; 2 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील जवळपास 23 गावांमधील विविध विकासकामांसाठी राज्यसभेचे सदस्य खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील विकासकामांना गती प्राप्त होणार आहे. कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी खासदार फंडातून निधी उपलब्ध व्हावा, अशी … Read more

शिवप्रताप दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । प्रतापगड येथे १९ डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन सोहळा आयोजित केला जाणार आहे. हा सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. शिवप्रताप दिन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपवन … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याची 74 लाखांची फसवणूक,9 जणांवर गुन्हा दाखल

Green Power Sugars Factory News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, … Read more

सातारा जिल्हा न्यायालयात आता वैद्यकीय मदत कक्ष

Satara News 20231206 115851 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आपत्कालीन परिस्थितीत न्यायालयात येणार्‍यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी वैद्यकीय कक्ष असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालयामध्ये वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संशयित किंवा पक्षकारांना आवश्यकता भासल्यास समुपदेशनाची सोयही या कक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. न्यायालयामध्ये दररोज संशयित तसेच पक्षकार मोठ्या प्रमाणावर येत असतात. … Read more

पब्जी खेळताना ‘त्याच्या’शी झाली ओळख; विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन तरुणीसोबत घडलं असं काही…

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १९ वर्षीय तरुणीवर उत्तर प्रदेशातील युवकाकडून वारंवार अत्याचार करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. उवैश नसीम अन्सारी (वय २४, रा. माैदाहा, ता. रागोल, जि. हमीदपूर, राज्य उत्तर प्रदेश), असे … Read more

उड्डाण पुलाच्या कामामुळे सातारा-पुणे मार्गावरील वाहतुकीत उद्यापासून बदल

Satara News 20231205 232145 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे नवीन उड्डाण पुलाचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे सातारा-मार्गावर खंडाळा हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली असून पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल खेड-शिवापूर ते शेंद्रे-सातारा दरम्यान काम सुरू आहे. त्याअंतर्गत … Read more

हृदयद्रावक घटना! आईचा डोळा चुकवून बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

Crime News 20231205 085729 0000

सातारा प्रतिनिधी | आपल्या आईचा डोळा चुकवून बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४), वेदांत रोहिदास गुजले (वय १२, रा. हिवरे, ता. कोरेगाव), अशी मृत मुलांची नावे आहेत. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह सापडले असून या घटनेमुळे कोरेगाव … Read more

कराडचा ‘विजय दिवस’चा मुख्य सोहळा यंदा रद्द; नेमकं काय आहे कारण?

Karad News 20231205 004959 0000 jpg

कराड प्रतिनिधी | बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ १९९८ पासून (कोरोनाचा काळ वगळता) कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे. मात्र, यंदा विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती हाती आली असून विजय दिवस समारोहाच्या अनुषंगाने सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्य सोहळा रद्द होण्यामागे नागरिकांच्या सुरक्षिततेचे कारण समोर आले … Read more

कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं प्रांत-तहसीलदारांच्या हस्ते वितरण

Karad News 20231204 233312 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबीच्या नोंदी तपासणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं वितरण प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते अमित जाधव (तासवडे) यांना करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. अमित जाधव यांना कुणबी दाखला वितरित … Read more