संस्कारला गाडीची रेस करणं पडलं जीवानिशी; स्कुटीसकट भिंतीवर जाऊन आपटला अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या तरुणांमध्ये दुचाकी रेस लावण्याचे प्रमाण भलतेच वाढले आहे. एखादा सुनसान रस्ता सापडला आठ महामार्गावरून जाताना दुचाकीची रेस लावून ती पळण्याची हौस त्याच्याकडून पूर्ण केली जात आहे. मात्र, हे करत असताना तीच हौस जीवावरही बेतत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे घडली. खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. असाच त्याने या गावातील एका स्कुटीवर (दुचाकी ) बसून रेस तो करत होता. मात्र, याचवेळी गाडीने अचानक वेग घेतल्याने ही गाडी भरधाव वेगात समोर असणाऱ्या कठड्याला तसेच भिंतीवर जोरात आढळली. या अपघातात संस्कार राऊत हा गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. यावेळी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संस्कार हा अहिरेश्वर विद्यालय अहिरे ( ता. खंडाळा ) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. या मुलाला नेहमी कोणाचीही गाडी घेऊन, गाडी जागेवर उभे करून, रेस करण्याची मोठी हौस होती. असाच त्याने या गावातील एका स्कुटीवर (दुचाकी ) बसून रेस तो करत होता. मात्र, याचवेळी गाडीने अचानक वेग घेतल्याने ही गाडी भरधाव वेगात समोर असणाऱ्या कठड्याला तसेच भिंतीवर जोरात आढळली. दरम्यान, यावेळी या गाडीच्या पाठीमागे आजूबाजूला उभे असणारे लोक हे धावत या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

भिंतीला धडकून झालेल्या या अपघातात सहावीमध्ये शिकत असलेला संस्कार हा गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला खंडाळा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी लोणंद किंवा शिरवळला हलवण्याचे सांगितल्यानंतर लोणंदला एका खासगी दवाखान्यात दाखल करताच संस्कार लक्ष्मण राऊत मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे म्हावशी गावावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. खंडाळा पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस तपास करत आहेत.