पाटण प्रतिनिधी । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी धरणाच्या पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट आज सकाळी 10 वाजता बंद करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.61 टीएमसी झाला असून, सुमारे 78.49 टक्के धरण भरले आहे.
कोयना धरणाच्या जलाशयात प्रतिसेकंद 3 हजार 824 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या 24 तासात कोयनेला – 9 मिलीमीटर, नवजा – 18 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 22 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या पावसापैकी कोयनेला – 3 हजार 133, नवजा – 4 हजार 465 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरणाची पाणी पातळी 2144′ 01″ (653.517m) इतकी झाली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडील धोम, कोयना, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत बऱ्यापैकी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरण भरण्यास उशीर लागणार आहे. आज सकाळी 10 वाजता पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद करण्यात आली आहेत.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 09/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2144′ 01″ (653.517m)
Dam Storage :
Gross : 82.61 TMC (78.49%)
Inflow : 3,824 cusecs
Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs
Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 09/3133
Navaja : 18/4465
Mahabaleshwar : 22/4150