वसुली अधिकाऱ्याची 1.5 लाखांची पैशांची बॅग हिसकावून पळाले; पोलिसांनी 36 तासात दोघांना ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । धूम स्टाईलने बाईकवरून येत वसुली अधिकाऱ्याकडून पैशांची बॅग हिसकावलयाची घटना केंजळ गावचे हद्दीत घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 36 तासात भुईंज पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेत त्यांना धर्मपूरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. अजय मोहन पाटोळे (वय 22, रा. धर्मपूरी, ता. माळशिरस जि.सातारा) आणि दिपक नाना जाधव (वय 37 वर्ष, रा. धर्मपूरी ता. माळशिरस जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ जुलै रोजी १३.५० वाजण्याच्या सुमारास केंजळ गावचे हद्दीत बोडरे वस्ती ते केंजळ जाणारे कच्चा रोडने चैतन्य इंडिया फीन क्रेडीट प्रा.लि. वाई शाखा सातारा येथील वसुली अधिकारी जात होते. यावेळी ते बेघर वस्तीजवळ गेले असतात त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसमी आले.त्यांनी दुचाकी त्यांच्या आडवी मारुन संबंधित अधिकाऱ्याकडून 1.5 लाखाची रोकड आणि फायनान्स कंपनीचे पावती पुस्तक महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग हिसकावेळी. आणि त्या अधिकाऱ्यास ढकलून देत त्या ठिकाणाहून धुमी ठोकली.

या घटनेनंतर संबंधित वसुली अधिकाऱ्यांनी भुईंज पोलिसात जाऊन लुटमारीबाबत माहिती देत फिर्याद दिली. अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयित पळून गेलेल्या मार्गावरील ३० ते ३५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हयात आरोपींनी वापरलेली दुचाकी निष्पन्न केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हयातील दोन आरोपिचई माहिती घेतली. त्यावेळी संबंधित दोन आरोपी हे धर्मपूरी ता.माळशिरस जि. सोलापूर येथील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपास पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतली.

दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी गुन्हयात चोरीस गेलेल्या दीड लाखापैकी 35 हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे आणि आरोपींनी वापरलेला मोबाईल, असा एकूण 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक भंडारे, हवालदार नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. 36 तासात गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे डीवायएसपी बाळासाहेब भालचीम यांनी भुईंज पोलिसांचे कौतुक केले.