बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट CCTNS पुरस्कार; जिल्ह्यात बजावली सर्वोत्तम कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व सर्वोत्कृष्ट सीसीटीएनएस पुरस्काराने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी पोलीस ठाण्यास मालमत्ता हस्तगत करणे, पोलीस ठाणेकडील सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. बोरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखा व सीसीटीएनएसचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सदर सुचनांचे अनुशंगाने काम करण्याचे सुचना दिल्या होत्या.

या कामगीरीबाबत बोरगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षकरविंद्र तेलतुंबडे, पोलीस अंमलदार पो. ना. प्रशांत चव्हाण, पो. कॉ. बाळासाहेब जानकर, पो. काँ. केतन जाधव, पो. कॉ. अतुल कणसे, म.पो.ना. मोनिका निंबाळकर व म. पो. कॉ. शितल पवार यांना जिल्हा पोलीस अधीक्षकसमीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांचे हस्ते सप्टेंबर २०२४ मध्ये केलेले कामगिरीबाबत पुरस्कार देवुन सन्मानीत केले आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

बोरगाव पोलीस ठाण्याचे रविंद्र तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमनदार पो. ना. प्रशांत चव्हाण, पो, काँ बाळासाहेब जानकर, पो. करें. केतन जाधव, पो. कॉ. अतुल कणसे यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये सीईआयआर पोर्टलद्वारे गहाळ मालमत्ता असणारे एकूण ५५ मोबाईल हस्तगत करून ते तक्रारदार यांना परत करुन संपूर्ण जिल्ह्यात सर्वोतम कामगिरी केली आहे. सीसीटीएनएस कार्यालयाचे महिला पोलीस अंमलदार म पो ना मोनिका निंबाळकर व म. पो. कॉ. शितल पवार यानी सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट काम केले आहे.