जिल्ह्यातील ‘या’ मंदिरातील दर तासांनी वेळेची सूचना देणारी घंटा गेली चोरीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी मोठी घंटा लागते. अशीच एक वेगळी घंटा चोरीस गेल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे कि जी दर तासांनी वेळेची सूचना देत होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यास ताब्यात घेतले आहे.

चाफळ (ता. पाटण) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे दहा किलो वजनाची पूर्वापार वापरात असलेली पितळी गोलाकार घंटा चोरीला गेली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्हीच्या आधारे एकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. योगेश जयवंत शिंगाडे (रा. खोडद-अतीत, ता. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे.

चाफळ येथील मंदिरात सुमारे दहा किलो वजनाची पितळी घंटा होती. ही घंटा दर तासांनी वेळेची सूचना देत होती. या घंटेचा आवाज परिसरातील गावात निनादतो. मात्र, रविवारी रात्री ही घंटा चोरीला गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या चोरीबाबत कसून चौकशी केली जात आहे. राम मंदिरात सुरक्षारक्षक असूनही चोरट्याने घंटा चोरून नेल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.