कराड नजीक ‘या’ गावातील मंदिरास मिळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सैदापुर येथील शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिरास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील याच्या कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. तसेच आमदार पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

याप्रसंगी सरपंच फत्तेसिंह जाधव, मानसिंगराव जाधव (नाना), उपसरपंच अनिल जाधव, सोसायटीचे चेअरमन शरद जाधव, व्हा.चेअरमन बाजीराव जाधव, मुसा आंबेकरी, कुमार देसाई, सागर जाधव, सुरेश हजारे, सचिन दणाने, पृथ्वीराज जाधव, मयूर जाधव, अमोल जाधव, रमेश जाधव, नारायण जाधव, विलास कणसे, रफिक सय्यद, दादा काशीद, कुलदीप जाधव, रणधीर जाधव, अवधूत जाधव, अभिजित जाधव, विजय माळी, प्रमोद जाधव, संग्राम जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

सैदापूर येथील शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिराचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी मी मंत्री असताना प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश येऊन श्री पावकेश्वर मंदिरास ‘क’ वर्ग पर्यटनास्थळ दर्जा प्राप्त झाला आहे.