कराड प्रतिनिधी । आम्ही भाजपच्या कराड उत्तर परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावागावात जात आहोत. आतापर्यत ज्या ज्या गावात आपण गेलो तेव्हा जनतेने केलेल्या मागणीनुसार त्यांची कामे केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात कराड उत्तर विहंसभा मतदार संघात किती विकास कामे झाली. आम्ही आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहाय्य योजनेतून तब्बल 480 कोटी रुपये निधी असणाऱ्या विकास कामे मंजूर करून आणली आहेत. आतापर्यंत कराड उत्तरच्या आमदार म्हटला कि मला सत्ताधारी निष्क्रिय आमदार म्हणतायत. हो आम्ही त्यांना निष्क्रिय आमदार म्हणतो कारण त्यांनी २५ वर्षात काही कामे केली नाहीत. त्यांनी ४८० कोटींचा रस्ता मंजूर केल्याचे दाखऊन द्यावे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्यावर केली.
भाजप परिवर्तन यात्रेअंतर्गत पाल येथे नुकतीच सभा पार पडली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील याच्यावर निशाना साधला. यावेळी कदम म्हणाले की,कराड उत्तर विधानसभा मतदार संघात बाळासाहेब पाटील २५ वर्षे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत किती आणि काय विकासकामे केली हे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आम्हाला दिसत आहेत. सर्वसामान्य जनताच त्यांनि काही विकास कामे न केल्याची सांगत आहेत. आम्ही नुकताच ४८० कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करून आणला आहे. हे विद्यमान आमदारांना जमणार आहे का? हे त्यांनी दाखवून द्यावे.
मल्हारपेठ ते पंढरपूर रस्त्यासाठी मंजूर झालेल्या 480 कोटी रुपयांच्या विकास कामाचे ऑनलाईन भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आम्ही कराड ऊत्तर विधानसभा मतदार संघात जी काही विकासकामे मंजुर करून आणली आहेत. त्याचा येथील जनतेला खूप फायदा होणार आहे. आता कराड उत्तर विधानसभा मतदार संघात गावागावाचा आकायापालट आम्ही केल्याशिवाय राहणारनाही. जनतेला जर विकास हवा असेल तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडणे आवश्यक असल्याचे जिल्हाध्यक्ष कदम याणी म्हटले.