कराडात रविवार होणार इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा, आ. बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा रविवारी सायंकाळी ४ वाजता पंकज हॉटेलच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. शरद देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात सर्वत्र इंडिया आघाडीचे गठबंधन झाले आहे. महाराष्ट्रात उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर होतील. तत्पुर्वी कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू करण्यात आले आहेत. वाईमध्ये संयुक्त मेळावा झाला आहे. आता तालुकानिहाय मेळावे होणार आहेत.

हर्षद कदम म्हणाले की, इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, ती जे जागा संबंधित पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्या उमेदवाराचे काम करणे बंधनकारक आहे. प्रशांत यादव यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण यांनी आभार मानले.