मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी; जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार जणांना मिळाला लाभ

Satara News 18 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील किमान उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, शैक्षणिक विकासास हातभार लावणे, त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणे आदी विविध उद्देशाने प्रेरित होऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण विकास व प्रशिक्षण मानव विकास (सारथी) संस्था (पुणे) काम करते. संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व … Read more

कुणबी दाखल्यांच्या अडचणी सुटणार; मराठ्यांचे राज्यातील पहिले जनसंपर्क कार्यालय कराडात सुरु

Karad Kunbi Certificate PRO Office News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी नोंदींसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी कराडमधील कराड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. … Read more

अनधिकृत उपसा सिंचन पंप काढून घ्या; अन्यथा कठोर कारवाई करू; कोयना सिंचन विभागाचा इशारा

Koyna Irrigation News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना सिंचन व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृतपणे पाणी उचलत असलेल्या उपसा सिंचन योजनाधारकांनी आपले उपसा सिंचन पंप तात्काळ काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर पाटबंधारे अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०२४ अखेर पिण्याचे पाणी … Read more

निरा – देवधरच्या 3591.46 कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मान्यता : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Nira Deodhar Project News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रतील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा निरा-देवधर प्रकल्पाचा प्रश्नाबाबत सातत्याच्या पाठपुरावा केल्यामुळे हा मार्गी लागला आहे. केंद्र शासनाने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या अंतिम गुंतवणूक स्पष्टतेस मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण, भोर, माळशिरस भागांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. खा. रणजितसिंह नाईक … Read more

कामगार विभागाच्या उपसंचालकाला 17 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Satara Crime News 20231208 091015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कामगारांच्या वैद्यकीय तपासणी बिलाच्या रकमेसाठी तीस टक्क्यानुसार प्रमाणक शल्यचिकित्सकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील कामगार विभागाच्या उपसंचालकाला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नंदकिशोर आबासाहेब देशमुख, असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी सातारा एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील कामगारांची वैद्यकीय तपासणी केली … Read more

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात करण्यासाठी समिती स्थापन

Shivaji University News jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटनांकडून मागणी केली जात होती. यासंदर्भात अनेकवेळा लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. याची दखल घेत व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही. … Read more

चक्क ‘तो’ स्मशानभूमीत विकायचा ताडी; पोलीस आले अन् पुढं घडलं असं काही…

Satara News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । एखादा बेकायदेशीर धंदा करायचं झालं कि तो पोलिसांना माहिती मिळणार नाही अशा ठिकाणी केला जातो. मग ते ठिकाण काय असेल याचा अंदाज देखील लावता येत नाही. परंतु, पोलीस त्यापर्यंत पोहचतातच. मात्र, समोर येत एक धक्कादायक दृश्य कि जे पाहून पोलिसही चक्रावून जातात. अशीच एक कारवाई पाचगणी पोलिसांनी केली. पाचगणी शहरात एकजण ताडी … Read more

साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Satara News 15 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विविध रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावे यासाठी काँक्रिटीकरणाचा पर्याय निवडून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत, असे मत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. श्रीमंत छ. शाहू उद्यान (गुरुवार बाग) येथील … Read more

ध्वजदिन निधीत योगदान देऊन सैनिकांच्या गौरवात वाटा उचलावा : निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

Satara News 13 jpg

सातारा प्रतिनिधी । देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शूर जवानांनी प्राणांची आहुती दिलेल्याबलिदानाचा, त्यांच्या देशसेवेचा गौरव म्हणून ध्वजदिन निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कायर्कर्म आज पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, … Read more

कालेत रविवारी होणार कुस्त्यांचे जंगी मैदान; नामवंत पैलवान थोपटणार दंड

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । काले ता. कराड येथे रविवार, दि. १० रोजी व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळाच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानात दीपक लोखंडे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी २ लाख रुपयांचा बक्षिसाची प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या प्रेरणेने … Read more

राहुरी विद्यापीठ – सातारा जिल्हा बॅंकेत झाला ‘हा’ महत्वाचा सामंजस्य करार

Satara News 12 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 6 हजार तरुण शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढ करण्याची चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्हा बँकेत या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, आ. बाळासाहेब पाटील, … Read more

संगम माहुलीत रस्ता रोको केल्याप्रकरणी 60 जणांवर गुन्हा दाखल

20231205 225757 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – लातूर या मार्गावर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, लवकरात लवकर काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून संगम माहुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत हवालदार विश्वनाथ मेचकर यांच्या फिर्यादीनुसार सातारा ते लातूर महामार्ग संगममाहुली येथे … Read more