कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिले आहेत. कराड दक्षिण मतदार संघाची मतमोजणीची बारावी फेरी पार पडली असून या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांना 6742 मते तर डॉ. अतुल भोसले यांना 9384 इतकी मते मिळालेली आहेत. या ठिकाणी डॉ. अतुल बाबा भोसले यांनी 2 हजार 642 मतांनी लीड घेतली आहे. yaa ठिकाणी डॉ. अतुल भोसले यांनी एकूण 18 हजार 615 मते घेत आघाडी घेतली आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सोळाव्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील यांना 52490 मात्र तर मनोज घोरपडे यांना 86622 मते पडली आहेत. या ठिकाणी मनोज घोरपडे यांनी 34,132 मतांनी आघाडी घेतली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून मनोज घोरपडे आणि महाविकास आघाडीलून बाळासाहेब पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर कराड दक्षिण मतदार संघात महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले तर महाविकास आघाडी सरकारकडून पृथ्वीराज चव्हाण उमेदवार आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडेंनी याठिकाणी मोठी आघाडीत घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सलग पाचवेळा निवडून आलेले आमदार बाळासाहेब पाटील पराभवाच्या छायेत आहेत. तर गेली सत्तर वर्षे काँग्रेसचा एकहाती गड राहिलेल्या कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपा उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी कडवी लढत देत आघाडी घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात दोनवेळा पराभूत झालेल्या डॉ. अतुल भोसलेंनी यंदा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे.