धोकादायक वळणावर दिवशी घाटात अचानक कोसळली दरड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । ढेबेवाडी – दिवशी घाटात जुळेवाडीकडून ढेबेवाडीकडे दुचाकीवरून येत असताना दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूच्या धोकादायक वळणावर अचानक दरड कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यामध्ये असवलेवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी गंभीर जखमी झाला. जयवंत बाळकू चव्हाण (वय ५५, असवलेवाडी, ता. पाटण) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती की, पाटण तालुक्यातील असवलेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी जयवंत चव्हाण हे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून ढेबेवाडीला कामानिमित्त निघाले होते. ते दिवशी घाटातील दत्त मंदिराच्या पुढच्या वळणावर पाण्याच्या धबधब्याजवळ आल्यावर डोंगरातून अचानक दरड कोसळली व ती गाडीवर आल्याने ते खाली कोसळले.

दिवशी घाटातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी थांबून त्यांची विचारपूस करून संबंधिताच्या घरातील लोकांना या घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.