पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.46 टीएमसी झाला असून, सुमारे 78.35 टक्के धरण भरले आहे. जलाशयात प्रतिसेकंद 5 हजार 549 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरण क्षेत्रात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 82.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 12 मिलीमीटर, नवजा – 27 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 51 मिलीमीटर पाऊस पडला.
त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या पावसापैकी कोयनेला – 3 हजार 124, नवजा – 4 हजार 447 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरणाची पाणी पातळी 2143′ 11″ (653.466m) इतकी झाली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरूवात झाली. पश्चिम भागात सवा महिना पाऊस पडत होता. त्यातील १५ दिवस संततधार होती. त्यामुळे कास, तापोळा, बामणोली, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरातील जनजीवनावर परिणाम झालेला. तसेच पश्चिमेकडीलच धोम, कोयना, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या ही धरणे ७० टक्क्यांवर पोहचली आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरण भरण्यास उशीर लागणार हे नक्की.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 08/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2143′ 11″ (653.466m)
Dam Storage :
Gross : 82.46 TMC (78.35%)
Inflow : 5,549 cusecs
Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs
Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 12/3124
Navaja : 27/4447
Mahabaleshwar : 51/4128