सर्वोत्तम कामगिरीबद्दल पाचगणी पोलिसांचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व टीमला चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात उत्कुर्ष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी उघडकीस आणले. त्यात लंपास केलेली मालमत्ता हस्तगत केली. त्यातील काही मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेनंतर तक्रारदारांच्या स्वाधीनही केली. अनेक चोरीच्या गुन्ह्याचा चोख तपास करून त्यात चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आघाडी घेत संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस नाईक श्रीकांत कांबळे, तानाजी शिंदे, काॅ. उमेश लोखंडे यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या टीमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.